Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अकोले मंद्रूप येथे 25 15 अंतर्गत केलेला स्मशानभूमीचा रस्ता अखेर खचला; ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष

 अकोले मंद्रूप येथे 25 15 अंतर्गत केलेला स्मशानभूमीचा रस्ता अखेर खचला; ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष, 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले- मंद्रूप या येथे पीडब्ल्युडीच्या अखत्यारितील २५ १५ योजनेअंतर्गत स्मशानभूमी रस्त्याचे काम शुक्रवारी करण्यात आले होते. सदरच्या रस्त्यावर वाढलेले गवत न काढता, पाणी न मारता रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले होते. ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा रस्ता खचलेला दिसून आला. या ठेकेदाराच्या चुकीच्या कामकाजाकडे पीडब्ल्यूडी विभागील वरिष्ठ अधिकारी आता तरी लक्ष देतील का? असा सवाल संतप्त ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...



Post a Comment

0 Comments