Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मोहोळ तालुक्यातील एका गावात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालसाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

मोहोळ तालुक्यातील एका गावात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालसाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा





मोहोळ तालुक्यातील एका गावात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी ठोठावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, फिर्यादीची पत्नी, पीडित बालिका, वैद्यकीय अधिकारी, कपडे जप्ती आणि तपासी अंमलदार यांचीसाक्ष महत्त्वाची ठरली. १६ मार्च २०२१ रोजी हा अपराध घडला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची पत्नी ही चारा घेऊन आरोपीच्या घरासमोरून जात होती. तेथे फिर्यादीची मुलगी पलंगावर होती. दशरथ याने दुष्कर्म केल्याचे बालिकेने सांगितले. त्यानंतर हा प्रकार फिर्यादीने भावकीतील लोकांना सांगून कामती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. न्यायालयाने आरोपीला दोषी धरुन दि. 21 मार्च रोजी दुयारी 4 वाजण्पाच्या सुमारास शिक्षा ठोठावली. आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, कोर्ट पैरवी पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव, प्रभारी अधिकारी एपीआय उदार यांनी काम पाहिले.


वैद्यकीय पुरावा, फिर्यादी,फिर्यादीची पत्नी आणि पीडित बालिका यांच्या सांक्षीपुराव्यांच्या आधारे आरोपीने दुष्कर्म केल्याचे, सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल प्रदीपसिंग राजपूत यांनी सिद्ध केले. आरोपीने केलेले कृत्य हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे आरोपीस जास्तीत कठोर शिक्षा करावी असा युक्तिवाद करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी वकिल प्रदीपसिंग राजपूत यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पत्रचारांशी बोलताना सांगितले.

 ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

Post a Comment

0 Comments