सोलापूर तुळजापूर महामार्गावरील उळेगाव येथे अरुंद पुलाला धडकून 45 प्रवाशासह खाजगी ट्रॅव्हल्स पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही
सोलापूर तुळजापूर महामार्गावरील उळेगाव येथे दि. 19 एप्रिल रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास कोल्हापूरहून परभणीकडे निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स अरुंद पुलाला धडकून ४५ प्रवाशांसह पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यातील सुमारे 25 प्रवाशांना मुकामार लागल्याने त्यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात ग्रामस्थांच्या मदतीनै रुग्णसेवक महंमद पठाण यांनी दाखल केले. येथील अरुंद पुलाबद्दल उळेगाव ग्रामपंचायतीकडून वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन देखील प्रशासनाने याची दखल घेतली नाही. म्हणून महिन्यातून असे तीन ते चार नेहमी अपघात घडत असल्याचे यावेळी ग्रामस्थांमधून बोलले जात होते. या घटनेची नोंद सिविल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.
ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी
बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक सागर कोळी
97636 21820
हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट
ल
0 Comments