Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अनैतिक संबंधातून दोघांचा खून केल्याप्रकरणी पाच संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी...

 अनैतिक संबंधातून दोघांचा खून केल्याप्रकरणी पाच संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी...



अनैतिक संबंघाच्या कारणावरून पत्नी व तिचा प्रियकर या दोघांचा बुधवार, दि. 10 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याप्रकरणी मंद्रूप पोलिसांनी मुख्य आरोपीसह इतर चौघांना जेरबंद केले आहे. त्यांना गुरुवार, दि. ११ एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुमावली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका खून खटल्यातील मुख्य संशयित आरोपी हा घटनेनंतर सोलापूरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारी होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्याचा शोध सुरु झाला. पीएसआय अमितकुमार करपे यांच्या पथकाने त्याला शहराजवळील सलगर वस्ती परिसरातून ताब्यात घेतले. तर इतर चार संशयित आरोपी घटनेनंतर पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी लगेचच तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले होते. घटनेच्या दिवशी रात्री उशिरा चारही संशयित आरोपी बरूर येथील शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांनाही बुधवारी मध्यरात्री अटक केली. सध्या ते पोलिस कोठडीत असून या खुनात त्यांचा सहभाग, किती, कशाप्रकारे त्या दोघांचा त्यांनी खून केला, या बाबींचा अधिक तपास मंद्रूप पोलिस करीत असल्याची माहिती मंद्रूप पोलीसांकडून शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट





Post a Comment

0 Comments