Advertisement

Breaking News
Loading...

कामती खुर्ढ येथील पुलाजवळ जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या दोघांवर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल

 कामती खुर्ढ येथील पुलाजवळ जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या दोघांवर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल


मोहोळ तालुक्यातील कामती खुर्ढ येथील पुलाजवळ जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या दोघांवर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत प्रेमचंद परदेशी, (वय-34), रा. भवानी पेठ, सोलापूर मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार दि.7 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील पुला जवळ आयशर कंपनीचा टेम्पों त्याचा क्र. MH-46-F-5295 चा चालक मिथून मकबुल शेख वय-25, रा. मल्लीकार्जुन नगर, सोलापूर व सोबत क्लिनर अनिकेत बाळासाहेब ढावरे वय 24, रा. भीमनगर, ता. सांगोला, या दोघांनी यांनी त्यांच्या ताब्यातील टॅम्पो मध्ये जनावारांची वाहतुक करताना मिळून आले आहेत. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना, जनावारांची क्षमतेपेक्षा अधिक दाटीवाटीने, चारा पाण्याची सोय न करता वाहतुक करताना मिळून आले आहेत. म्हणुन दोन्ही आरोपीं विरूध्द मोहोळ पोलीसात दि. 7 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करीत असल्याची माहिती मोहोळ पोलीसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल






Post a Comment

0 Comments