Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

लांबोटी येथे एकावर धारदार तलवार फेकून मारल्याने मोहोळ पोलिसात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

लांबोटी येथे एकावर धारदार तलवार फेकून मारल्याने मोहोळ पोलिसात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल





मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे गजबजलेल्या भर चौकात बोलावून एकावर धारदार तलवार फेकून मारल्याने मोहोळ पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी मंगळवार, दि. 9 एप्रिल रोजी पत्रकारांशी बोलताना दिली.


मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे शुक्रवार, दि.5 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भारत होनमाने यांनी विकास जाधव यांना गजबजलेल्या लांबोटी चौकात बोलावून कृष्णा बाबुराव सलगर यांनी त्यांच्या हातातील धारदार तलवार फिर्यादीच्या दिशेने फेकून मारली. तसेच त्यांच्यासोबत असणारे अमित सज्जन पाटील, वैभव पाटील, रवी पाटील, सर्जेराव पाटील, गोपी पाटील, भाऊराव सलगर व शाहीर जराग या सर्वांनी फिर्यादीस लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याने सातही जणांविरोधात शुक्रवार, दि. ५ एप्रिल रोजी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे हे करीत असल्याची माहिती मोहोळ पोलिसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

 बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments