मंद्रूप | दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक : डॉ. राजदत्त रासोलगीकर |
मंद्रूप पोलीस ठाण्यातील शासकीय मालमत्तेच्या वापराबाबत गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील एक वाहन कथितरित्या स्वतःच्या शेतावर नेऊन तेथील कामगाराच्या वापरासाठी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, पोलीस ठाण्यातील इन्व्हर्टर आणि बॅटरीही वैयक्तिक वापरासाठी नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, रात्रीच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहन तसेच इन्व्हर्टर-बॅटरी पुन्हा पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
शासकीय वाहन व साहित्याचा वैयक्तिक वापर झाला असल्यास हा प्रशासकीयदृष्ट्या गंभीर विषय ठरू शकतो. त्यामुळे वाहनाच्या हालचाली, स्टेशन डायरी, संबंधित मालमत्तेची नोंद तसेच वाहन व साहित्य ने-आणण्याबाबतचे पुरावे तपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याची चौकशी झाल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.





0 Comments