सोलापूर, दि. २४ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूरची हुशार व होतकरू विद्यार्थिनी चि. ज्योती कृष्णदेव खंडागळे हिची सोलापूर जिल्ह्यातून पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्योतीने उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
ज्योतीला प्रशालेतील क्रीडा शिक्षक सुभाष उपासे, संजय पंडित आणि प्रसन्न काटकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री ए. पी. डी. जैन पाठशाळेचे सचिव डॉ. रणजीत गांधी, विश्वस्त पराग शहा, भूषण शहा, प्रशालेचे प्राचार्य राजकुमार काळे, उपप्राचार्य शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
चि. ज्योती खंडागळे ही समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांची नात आहे. तिच्या या यशामुळे जैन गुरुकुल प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.



0 Comments