Advertisement

Breaking News
Loading...

सिंदखेड येथील देवीच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडून पैसे चोरल्याप्रकरणी ४ तरुणांविरोधात वळसंग पोलिसात गुन्हा दाखल

 सिंदखेड येथील देवीच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडून पैसे चोरल्याप्रकरणी ४ तरुणांविरोधात वळसंग पोलिसात गुन्हा दाखल


दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथील देवीच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडून पैसे चोरल्याप्रकरणी चार तरुणांविरोधात वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्रीकांत सत्यप्पा घोडके (वय २७, रा. सिंदखेड, ता. द. सोलापूर)), बसवराज श्रीशैल कांबळे (वय ३०), रोहन गौरीशंकर मळेवाडी (वय २८), सुनील लक्ष्मण भुई (वय ३०) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत शिवानंद गंगाराम वडतीले (वय ३२, रा. बुरूड गल्ली, सोलापूर) यानी वळसंग पोलिसात फिर्याद दिली आहे.


याबाबत वळसंग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दि. ७ एप्रिल २०२४ रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते ८ एप्रिल २०२४ च्या सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान श्री मेसाई देवस्थान, सिंदखेड येथे देवीच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून आतील दानपेटी उचकटून त्याचे कुलूप कडीकोयंडा तोडून आतील १८०० रूपये चिल्लर व भारतीय चलनी नोटा मुद्दाम लबाडीने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याबाबत वळसग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चव्हाण यांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन दि. ८ एप्रिल रोजी वळसंग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण हे करीत असल्याची माहिती बुधवारी वळसंग पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments