Advertisement

Breaking News
Loading...

श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर देवस्थान परिसरात श्री वीरभद्रेश्वर यात्रा संपन्न...

 श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर देवस्थान परिसरात श्री वीरभद्रेश्वर यात्रा संपन्न...


दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे श्री संगमेश्वर देवस्थान परिसरात सालाबादाप्रमाणे श्री वीरभद्रेश्वर यात्रा दि. १० एप्रिल २०२४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. दरवर्षी प्रमाणे चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी श्री वीरभद्रेश्वर पालखी व नंदीध्वजासह अग्नीमध्ये चालण्याचा व पुरवंत कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. सुमारे २५ पुरवंत स्वामींनी यामध्ये सहभागी होऊन टाळ व संभळाच्या साथीने वचन आणि गाणी सादर करत शस्त्रांचा खेळ सादर करण्यात आला. त्या यात्रेत आलेल्या भक्तांनी लाप्सीचा प्रसादाचा लाभ घेतला.


श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील यांनी या यात्रेसंदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट



Post a Comment

0 Comments