Advertisement

Breaking News
Loading...

आमदार प्रणिती शिंदे यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

 आमदार प्रणिती शिंदे यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती





काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भव्य असे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज गुरुवारी दाखल झाला. जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे प्रणिती शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.


काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी आवर्जून सोलापुरात उपस्थित होते. आठवले, यांच्यासह लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी मंत्री शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांची अर्ज भरतेवेळी उपस्थिती होती. प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्वला शिंदे, सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते.


सकाळी दहा वाजता काँग्रेस भवना समोर भव्य अशी जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेनंतर प्रणिती शिंदे यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. काँग्रेस भवना पासून निघालेली रॅली पानगल हायस्कूल, सिव्हिल चौक, बेडर पूल, जगदंबा चौक, सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. यावेळी कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला.

 ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments