Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अकोले मंद्रुप ते गुंजेगाव दरम्यान गायींची कत्तलीसाठी वाहतुक करणार्‍या अज्ञात चालकावर मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल; ₹ 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोले मंद्रुप ते गुंजेगाव दरम्यान गायींची कत्तलीसाठी वाहतुक करणार्‍या अज्ञात चालकावर मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल; ₹ 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त


दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप ते गुंजेगाव दरम्यान पिकअप त्याचा क्र. MH13AX 8780 या वाहना अज्ञात चालकाने जनावरांची कोणतीही वैदयकीय तपासणी प्रमाणपत्र आणि जनावर वाहतूकीचा परवाना नसताना गोवंश प्रजातीची 7 जनावरे दाटीवाटीने भरून त्यांना चारा पाणी न देता कत्तल करण्यासाठी घेवून जात असताना मंद्रूप पोलीसांना मिळून आले आहेत. ही कारवाई दि. 17 एप्रिल 2024 रोजी पहाटे 1.30 ते 2.30 वाजेच्या दरम्यान झाली. सदर पिकअप वाहनात 1 लाख 70 हजार किंमतीची 2 मोठे गिरगाई, 2 लहान गिरगाई, 1 खिल्लार गाय, 1 लहान खिल्लार गाय खोंड, 1 रेडकु आढळून आले. तसेच 1 लाख रु. किंमतीचे पिकअप वाहन असा एकुण 2 लाख 70 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ह्या बाबतीत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सोलापूर विभागाचे कार्यकर्ते गिरीश अंबादास मंचनाळ, वय 24 रा. कुमठा नाका, सोलापूर यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे म्हणून सदर अज्ञात चालकाविरुध्द मंद्रूप पोलीसात दि. 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोना बुरजे हे करीत असल्याची माहिती मंद्रूप पोलीसांकडून शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहेत.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट





Post a Comment

0 Comments