Advertisement

Breaking News
Loading...

वाफळे येथे 'दारू पिण्यासाठी पैसे देत नाही' म्हटल्याने एकाला दोघांकडून खोऱ्याने झाली मारहाण; सिविल रुग्णालयात उपचार सुरू

 वाफळे येथे 'दारू पिण्यासाठी पैसे देत नाही' म्हटल्याने एकाला दोघांकडून खोऱ्याने झाली मारहाण; सिविल रुग्णालयात उपचार सुरू


मोहोळ तालुक्यातील वाफळे येथे दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हटल्याने एका तरुणाला दोघांनी मिळून खोऱ्याने आणि लाचाबुक्क्याने जबर मारहाण केली. चंद्रकांत बाळासाहेब जाधव (वय 20), रा. वाफळे, ता. मोहोळ असे या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दि. 7 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत चंद्रकांत जाधव यांच्या डोक्याला, उजव्या हाताला जखम आणि सर्वांगास मुका मार लागल्याने त्यांना मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात उपचार करवून पुढील उपचारासाठी दि. 8 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालय वडील बाळासाहेब यांनी दाखल केले. रुग्ण शुध्दीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलीसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट



Post a Comment

0 Comments