Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अक्कलकोट बायपास ब्रीज जवळ आयशर टेम्पो वरील नियंत्रण सुटून पत्राशेडला धडकल्याने चालक गंभीर जखमी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू

 अक्कलकोट बायपास ब्रीज जवळ आयशर टेम्पो वरील नियंत्रण सुटून पत्राशेडला धडकल्याने चालक गंभीर जखमी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू


सोलापूरहुन गुलबर्गा कडे जात असताना आयशर टेम्पो चालकाने समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात आयशर टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने पत्राशेडला धडकुन गंभीर जखमी झाला. ही घटना दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. माऊली भगवान गुरुवे (वय 57), रा. सावळेश्वर, ता. मोहोळ असे जखमी चालकाचे नाव आहे. या अपघातात त्यांच्या छातीला आणि बरगडीला मुका मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना अक्कलकोट येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून मुलगा सुरेश गुरवे यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्ण शुध्दीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट



Post a Comment

0 Comments