Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

पापरी नाला येथील नाला फिडर येथे बंद केलेली वीज पुरवठा बनावट जंपने पुन्हा सुरु करणार्‍या अज्ञात इसमावर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल

 पापरी नाला येथील नाला फिडर येथे बंद केलेली वीज पुरवठा बनावट जंपने पुन्हा सुरु करणार्‍या अज्ञात इसमावर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल


दि.15 एप्रिल 2024 रोजी रात्री 10.30 वाजेच्या पूर्वी अज्ञात इसमाने पापरी नाला येथील 11.के.व्ही येवती नाला फिडर या ठिकाणी बांबुच्या सहाय्याने आकडा तयार करुन स्वतःच्या व इतरांच्या जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन बनावट जंपच्या सहायाने बंद केलेली वीज पुरवठा पुन्हा सुरु केला आहे. विद्युत वितरण कंपनी, पेनूरचे सहायक अभियंता सुशिल बबनराव देवकर, वय 35 वर्षे, रा. सुभाषनगर, मोहोळ यांनी याबाबत मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे.म्हणुन अज्ञात इसमाविरध्द भारतीय विद्युत कायदा - 2003 चे कलम 138 (ब), यासह भादंवि कलम-336 अन्वये मोहोळ पोलीसात दि. 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोना पठाडे हे करीत असल्याची माहिती मोहोळ पोलीसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी



बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments