Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळ शहरातील आठवडा बाझार येथे विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारु जवळ बाळगलेल्या महिलेवर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल

 मोहोळ शहरातील आठवडा बाझार येथे विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारु जवळ बाळगलेल्या महिलेवर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल


मोहोळ शहरातील आठवडा बाझार पाण्याचे टाकीचे जवळ पत्राशेडचे आडोशाला आरोपी साखराबाई रावसाहेब खंदारे (वय 53 ), रा आठवडा बाझार, मोहोळ हिने आपल्या कब्जात बेकायदा हातभट्टी दारु विक्रीकरीता जवळ बाळगलेल्या स्थितीत मोहोळ पोलीसांना मिळुन आली आहे. तिच्या ताब्यातून 500 रु. किंमतीची 10 लिटर हातभट्टी दारु असलेले दोन प्लॅस्टीक कॅन्ड, 2 हजार रु किंमतीची 40 लिटर हातभट्टी दारु असलेली एक काळया रंगाची टयुब असा एकुण 2,500 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला आहे. ही कारवाई दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास झाली. म्हणुन पोकॉ सिध्दनाथ मोरे यांनी मोहोळ पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार सदर महिले विरूध्द मुं. प्रोव्ही. का. क. 65 (ई) प्रमाणे मोहोळ पोलीसात 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पास पोह उपासे हे करीत असल्याची माहिती मोहोळ पोलीसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल




Post a Comment

0 Comments