Advertisement

Breaking News
Loading...

इंगळगी येथे आमदार प्रणिती शिंदे यांची जाहीर सभा...

 इंगळगी येथे आमदार प्रणिती शिंदे यांची जाहीर सभा...


दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी ये


थे महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. जेवढे आश्वासन दिले होते भाजप सरकारने, त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पंधरा लाख रुपये प्रत्येक व्यक्तीला देणार होते ते दिले नाही. कांद्याला भाव नाही, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढ, महागाई गॅस 300 वरून बाराशे रुपये करण्यात आले. दोन कोटी वर्षाला नोकऱ्या मिळणार होते ते सुद्धा खोटे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना पिक विमा देतो म्हणून दिले नाही. असे अनेक खोटे आश्वासन गेल्या दहा वर्षापासून देत आहेत. यावर्षी तुम्ही फसू नका असा घणाघात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केले. यावेळी ग्रामंचयात सदस्य सिध्देश्वर घोडके यांनी भाजपमधून क्रॉग्रेस प्रवेश केले.

यावेळी माजी आमदार दिलीप माने, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, माजी सभापती मप्पू जमादार, दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीश पाटील, तसेच इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे, उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव, गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवाज शेख, सोसायटी चेअरमन शिलिसिद्ध कोटे, बसवराज गाडेकर, ब्रह्मानंद गाडेकर, भीम बंदीछोडे, तमण्णा घोडके, कासिम शेख, सादिक शेख, पैगंबर शेख, माजी सरपंच अकबर शेख आदींची उपस्थिती होती.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments