Advertisement

Breaking News
Loading...

बाबासाहेबांच्या विचारासाठी शेवटपर्यंत लढत राहू - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

 बाबासाहेबांच्या विचारासाठी शेवटपर्यंत लढत राहू - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे


संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे - प्रणिती शिंदे


 आज चौदा एप्रिल 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केले. 


.काही लोकांनी घटना बदलण्याचे काम चालू केले आहे, आम्ही ते होऊ देणार नाही. बाबासाहेब आमचे जीव की प्राण आहेत. शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी विचारासाठी लढत राहू, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.


यावेळी श्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, संजय हेमगड्डी, सुरेश हसापुरे, विनोद भोसले, प्रमिला तूपलवंडे, गणेश डोंगरे, बाबा करगोळे, सुशीला आंबुटे, मधुकर आठवले, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे पत्रकारांशी दिलेल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट





Post a Comment

0 Comments