Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कर्देहळ्ळी येथील ग्रामदैवत श्री नृसिंह महाराजांच्या यात्रेस शनिवार पासून प्रारंभ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

 कर्देहळ्ळी येथील ग्रामदैवत श्री नृसिंह महाराजांच्या यात्रेस शनिवार पासून प्रारंभ; विविध कार्यक्रमांचे आयोजन




दक्षिण सोलापूर कर्देहळ्ळी येथील ग्रामदैवत श्री नृसिंह महाराजांच्या यात्रेस आज शनिवार पासून प्रारंभ झाला. या यात्रेनिमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, कुस्ती स्पर्धा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गणपत पवार यांनी शनिवारी रात्री ९ सुमारास वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली.


शनिवार, १३ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता नृसिंह लक्ष्मी मूर्तीस अभिषेक, सकाळी ११ वाजता धनगरी ओव्या, दुपारी ४ वाजता नंदीध्वज स्नान व सायंकाळी सात तैलाभिषेक, ६ वाजता नंदीध्वजास बाशिंग बांधणे, रात्री साडेआठ वाजता अक्षता सोहळा व ं नंदीध्वज आणि पालखीची मिरवणूक निघाली. रविवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता जंगी भारुडाचा कार्यक्रम, दुपारी १ वाजता महाप्रसाद सायंकाळी पाच वाजता कुस्ती स्पर्धा, रात्री ९ वाजता के. सीताराम कोळी यांच्या स्मरणार्थ बुलढाणा येथील कीर्तनकार माउली महाराज यांच्या कीर्तनासह सलग 5 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


यावेळी यात्रा कमिटीच्या इतर सदस्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या. या यात्रेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments