Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मंद्रूप पोलीस ठाणे येथे आगामी लोकसभा निवडणुक आणि विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राम सुरक्षा दलाची बैठक संपन्न..

 मंद्रूप पोलीस ठाणे येथे आगामी लोकसभा निवडणुक आणि विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राम सुरक्षा दलाची बैठक संपन्न..


पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या आदेशान्वये लोकसभा निवडणुक आचारसंहिता जनजागृती, आगामी डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती तसेच सध्या ग्रामीण भागात वाढत्या चोरी, घरफोडीचे गुन्हयांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणेबाबत मंद्रूप पोलीस ठाणे हददीतील सर्व गावचे पोलीस पाटील, सुजाण नागरीक, युवक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मंद्रूप पोलीस ठाणे येथे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये उपस्थित सर्व पोलीस पाटील, गावातील नागरीक, युवक यांना वाढत्या चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना म्हणुन, प्रत्येक गावांमध्ये ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात येत असुन, त्याबाबत त्यांना मार्गदर्शन व योग्य त्या सुचना देवुन, गावातील जास्तीत जास्त युवकांना ग्रामसुरक्षा दलात सामील होवुन गावांगावात रात्रीचे वेळी पोलीसांचे मदतीने गस्त घालणेबाबत आवाहन करण्यात आले. तसेच घरफोडी व चोरी टाळण्याकरीता आवश्यक त्या उपाययोजना व सुरक्षे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता चालु असल्याने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव साजरा करताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेणेबाबत सुचना देण्यात आल्या.


या बैठकीस सर्व गावचे पोलीस पाटील, मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत हुले, पीएसआय अमितकुमार करपे यांच्यासह १२ पोलीस अंमलदार, पत्रकार आणि मंद्रूप पोलीस ठाणे हददीतील १०० ते १२५ नागरीक उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट






Post a Comment

0 Comments