Advertisement

Breaking News
Loading...

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावात आमदार राम सातपुते यांचा दौरा; पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद


भारतीय जनता पक्ष व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध भेट दिली. याप्रसंगी युवा नेते मनिष देशमुखही त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी त्यांनी या भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


शनिवारी भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंंघातील सोरेगाव येथे सकाळी 10 वाजता हात्तूर येथे सकाळी 11 वाजता वडकबाळ येथे दुपारी 12 वा. वांगी येथे दुपारी 1 वा. मनगोळी येथे दुपारी 2 वा. गावडेवाडी येथे 3 आणि दुपारी 4 वा. कंदलगाव येथे भेट दिली. कंदलगाव येथील भेटीत बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले, मागील दहा वर्षांमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकासकामे केली आहेत. जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी यांनी भारताचे नाव उंचावले. विकासाच्या मुद्द्यावर व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मला साथ द्या, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते मनीष देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त केले.


याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments