Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

उत्तर तहसिल कार्यालयातून चोरीला गेलेला टेम्पो अखेर शहर गुन्हे शाखेने टाकळी येथून घेतले ताब्यात...

उत्तर तहसिल कार्यालयातून चोरीला गेलेला टेम्पो अखेर शहर गुन्हे शाखेने टाकळी येथून घेतले ताब्यात...




सोलापूर परिसरामध्ये अवैधरित्या वाळू उत्खनन करुन, ती वाळू छुप्या पध्दतीने विक्री होत असल्याने, त्याकरिता महसुल खात्यातर्फे भरारी पथक नेमण्यात आले आहे. नमूद भरारी पथकाने दि.३० मार्च रात्री १०.३० वा. च्या सुमारास अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा टाटा कंपनीचा टेम्पो त्याचा क्र. MH-12-R 8678 पकडला होता. सदरचा टेम्पो पुढील कारवाई करिता उत्तर तहसील कार्यालय, सोलापूर या ठिकाणी लावण्यात आला होता. मात्र, दिनांक ३१ मार्च रोजी, सकाळी सदरचा वाळूने भरलेला टेम्पो, कोणीरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. उत्तर तहसील कार्यालयातील मंडल अधिकार्‍यांच्या तक्रारीवरून, सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेकडील, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी, टेम्पो चोरीस गेलेल्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची पडताळणी करून, तसेच गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे आधारे, पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी, आरोपी सचिन दयानंद शिंदे, वय-२८ वर्षे, रा.मु.पो. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर यास दि. ३० मार्च रोजी रात्री साडे दहा वा सु वाळुने भरलेल्या टेम्पोसह ताब्यात घेतल्याची माहिती गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयातून पत्रकारांना देण्यात आली आहे.


या आरोपीकडे अधिक तपास केला असता, अनिल व्हनमाने, रा. मु. समशापूर, पो. नंदुर, ता. दक्षिण सोलापूर याच्या सांगण्यावरुन दि.३१/०३/२०२४ रोजी पहाटे ३ वा. च्या सुमारास उत्तर तहसील कार्यालय, सोलापूर येथून चोरी केला असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे सचिन शिंदे याचा सदर बझार पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३७९ या गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने, त्यास ताब्यात घेवुन, त्याच्याकडून गुन्हयामध्ये चोरी केलेला वाळूने भरलेला ०१,१२,०००/- रू किंमतीचा टेम्पो क्र. MH 12 R 8676 जप्त करुन, सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.


सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, गुन्हे शाखेचे पोलीस उप- आयुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.उप.नि. अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, वसिम शेख, सतिश काटे, सायबर पोलीस ठाण्याचे अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड यांनी केली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी 

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments