Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुरुल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची १९७ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरात रक्तदान करून साजरी करण्यात आली .

 कुरुल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची १९७ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरात रक्तदान करून साजरी करण्यात आली .


प्रारंभी सरपंच शीलाताई माने यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या अर्धपुतळ्यास, माजी जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत माने, समता परिषदेचे मोहोळ तालुका अध्यक्ष अमोल माळी. माळी महासंघाचे मोहोळ तालुका अध्यक्ष धनाजी माळी,माळी सेवा संघाचे मोहोळ तालुका अध्यक्ष अतुल ननवरे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला.


यावेळी मल्लीकार्जुन रक्तपेढी सोलापूर व क्रांती सूर्यप्रातिष्ठानच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ४१ रक्तदात्यांनी या शिबीरात रक्तदान करून सहभाग नोंदविला. या प्रसंगी माजी पोलीस प्रमुख शशिकांत माने, रक्तपेढीचे अधिकारी बाळासाहेब सातपुते, महात्मा फुले परिषदेचे मोहोळ तालुका अध्यक्ष अमोल माळी, भीमाशुगरचे संचालक बापू जाधव, भाजपा कृषी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम जाधव, युवा नेते प्रशांत पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख विनोद आंबरे, प्रमोद लांडे, चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी, पांडूरंग माळी, तुकाराम शिंदे, भाऊसाहेब पाटील, माऊली निकम, सुधीर जाधव, सुभाष शिंदे, वंचितचे विजय भालेराव, राहुल ननवरे, आकाश ननवरे, बाबु ननवरे, धनराज चंदनशिवे, आकाश ननवरे, अशोक ननवरे, अशोक क्षीरसागर यांच्यासह क्रांतीसुर्य प्रतिष्ठान, माळी समाज बांधव आणि कुरुल ग्रामस्थ बहुसंख्येंने उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट





Post a Comment

0 Comments