Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनगोळी ते कंदलगाव रोडवरील सले वस्तीजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल

 मनगोळी ते कंदलगाव रोडवरील सले वस्तीजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल



डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मनगोळी ते कंदलगाव जाणार्‍या रोडवरील सले वस्ती जवळ दि. 23 मार्च 2024 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली. हलाल रुस्तुम शेख (वय 45), रा. मनगोळी, ता. द. सोलापूर यांनी मंद्रूप पोलीसात फिर्याद दिली आहे. यातील फिर्यादी हे त्यांची मोटार सायकल त्याचा क्र. MH 13 BU 8491 वरून मनगोळी येथील घरातून कंदलगांवकडे डिझेल आणण्याकरीता जात असताना मनगोळी गावापासून २ किलो मिटर अंतरावर अंकुश सले यांच्या वस्तीजवळ गेला असता कंदलगांवाकडून डांबरी रोडचे कामकाज चालु होते. त्या रोडवर खडी, मुरूम टाकणारा डंपर त्याचा क्र. MH 13 CU 7200 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, निष्काळजीपणे, चालवून फिर्यादीच्या मोटारसायकलीस धडक देवून फिर्यादीच्या उजव्या हाताला, उजव्या जबडयाला व छातीचे बरगड्या फैक्चर करून जखमी करण्यास आणि मोटार सायकलचे अंदाजे १०,००० रुपयांचे नुकसान करण्यास कारणीभूत झाला आहे. म्हणून सदर डंपर चालकावर दि. 6 एप्रिल रोजी मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील हे करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलांकडून प्रेस नोट च्या माध्यमातून रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी 

97636 21820

हॅ



लो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments