Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नालबंदवाडी येथे पती- पत्नीच्या भांडणात पत्नीने गोचिड मारण्याचे विष प्राशन केले; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु

 नालबंदवाडी येथे पती- पत्नीच्या भांडणात पत्नीने गोचिड मारण्याचे विष प्राशन केले; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु


पती- पत्नीचे भांडण झाल्याने चिडून बायकोने राहत्या घरी गोचिड मारण्याचे विष प्राशन केल्याची घटना शुक्रवार, दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. साधना कमार माने (वय ४७, रा. नालबंदवाडी, ता. मोहोळ) असे त्या महिलेचे नाव आहे. यातील महिला व त्यांच्या पतीचे घरगुती कारणावरून भांडण झाल्याने रागाच्या भरामध्ये त्यांनी विष प्राशन केले. तदनंतर त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांना सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दाखल केले. रुग्ण शुध्दीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments