Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुळेगांव येथे जागेच्या कारणावरून पिकअपची तोडफोड करून एकाला जीवे मारण्याची दिली धमकी; तिघांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल

 मुळेगांव येथे जागेच्या कारणावरून पिकअपची तोडफोड करून एकाला जीवे मारण्याची दिली धमकी; तिघांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल


जागेच्या कारणावरून पिकअपची दगडाने तोडफोड करून दोघांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव येथे घडली. बुद्धाराम गिगारामजी पाटील (वय ४८), रा. रविवार पेठ, सध्या रा.मुळेगाव एमआयडीसी यांनी तालुका पोलीसात फिर्याद दिली आहे.


याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मुळेगाव शिवारातील एमआयडीसीमधील प्लॉट क्र. ६३ मध्ये श्रीनिवास चंद्रया कंदीकटला व श्रीनिवास कंदीकटला यांची पत्नी, दोघेही रा. गडगी नगर, सोलापूर व अज्ञात एकजण अशा तिघांनी मिळून फिर्यादीने करारावर घेतलेले हॉलची जागा जबरदस्तीने खाली करण्याच्या हेतूने फिर्यादीच्या कब्जात असलेल्या प्लॉट क्र. ६३ मध्ये प्रवेश करून मुलगा मुकेश पाटील याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या मालकीची पिकअप त्याचा क्र. एमएच १३ सीजे ०७२८ ची दगडाने तोडफोड केली. त्यानंतर हातोड्याने हॉलच्या लोखंडी दाराचे कुलूप तोडून हॉलमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. हॉलमधील फायबर पार्टची नासधूस करून नुकसान करून दोघांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून तिघांविरोधात सोलापूर तालुका पोलिसात दि. १० एप्रिल २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीसांकडून शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे..

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट





Post a Comment

0 Comments