Advertisement

Breaking News
Loading...

नजीक पिंपरी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम गंभीर जखमी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू

 नजीक पिंपरी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम गंभीर जखमी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू





मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक 45 वर्षीय अनोळखी पुरुष गंभीर जखमी झाला. हा अपघात दि. 8 एप्रिल रोजी सायं. 6 वाजेच्या सुमारास घडला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी दि. 9 एप्रिल 2024 रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालय येथे अँम्ब्युलन्सद्वारे डाॅ. सुनील होनमाने यांनी दाखल केले. रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments