Advertisement

Breaking News
Loading...

कुंभारी येथे सासरी आलेल्या जावयाला घरगुती वादातून 5 जणांकडून लोखंडी सळईने जबर मारहाण, सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू

 कुंभारी येथे सासरी आलेल्या जावयाला घरगुती वादातून 5 जणांकडून लोखंडी सळईने जबर मारहाण, सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू




दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे सासरी आलेल्या जावयाला घरगुती वादातून 5 जणांनी मिळून लाकडाने आणि लोखंडी सळईने जबर मारहाण केली. सूर्यकांत अमृताप्पा जमादार (वय 40), रा. बेदनवाडी, ता. आळंद, जि. गुलबर्गा हे दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कुंभारी येथील सासरी आले. यावेळी झालेल्या घरगुती वादातून त्यांना काशिनाथ कोळी व इतर 4 जणांनी मिळून लोखंदी सळई आणि लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या सर्वांगास मुका मार लागल्याने त्यांना उपचारासाठी दुपारी 1 वाजेच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात ते स्वतःहून दाखल झाले. रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments