मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) – सोलापूर ग्रामीण पोलीस मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “Run For Unity” हा उपक्रम शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता उत्साहात पार पडला.
ही धाव मंद्रुप बसस्थानक ते पोलीस ठाणे ते कन्री चौक, मंद्रुप या मार्गावर आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात मंद्रुप ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
या प्रसंगी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले की, “एकता आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी ‘Run For Unity’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे म्हणाले.”

0 Comments