सोलापूर शहर प्रतिनिधी: फौजदार चावडी पोलिसांनी फक्त १२ तासांत बस स्थानकावरील महिला प्रवाशाच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत महिला आरोपीस अटक करून सोन्याचे व चांदीचे दागिने परत मिळवून दिले. फिर्यादी जयश्री दत्तात्रय झुंजकर या तुळजापूर-सोलापूर बस प्रवासादरम्यान पर्सची चैन उघडून दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली API संजय क्षिरसागर यांच्या पथकाने गुप्त बातमीनुसार शिल्पा वेळू उपाध्ये (वय 19) हिला सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली व दागिने जप्त करण्यात आले.
दरम्यान, त्याच पथकाने स्वतंत्र कारवाईत ३ चोरीच्या मोटारसायकली (किंमत ₹3,40,000) जप्त करून आरोपी विशाल राठोड व प्रदीप राठोड यांना पकडले. सीसीटीव्ही तपास व गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या या कारवाया शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिसांचा विश्वास वाढवणाऱ्या ठरल्या आहेत.

0 Comments