Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळमध्ये LCB ची धडाकेबाज कारवाई! जबरी चोरी, कॉपर वायर व शेळ्या चोरी करणारा अट्टल आरोपी अमोल पवार अटक; ५५ किलो कॉपर वायर व सोन्याचे दागिने जप्त...

 


सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी, दि. 16 नोव्हेंबर 2025

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोहोळ परिसरात धडक कारवाई करत जबरी चोरी, कॉपर वायर चोरी व शेळ्या चोरी करणाऱ्या कुख्यात टोळीपैकी एक अट्टल आरोपीला जेरबंद केले आहे. पकडलेल्या आरोपीकडून ५५ किलो कॉपर वायर, सोन्याचे दागिने असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे.


🔹 मिळाली गुप्त माहिती, LCB कडून सापळा-

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी LCB च्या पथकाला विशेष कामगिरीवरील आदेश दिले होते. सहा पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांचे पथक मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सवतगव्हाण, अकलुज येथील अमोल उर्फ विशाल शंकर पवार हा त्याच्या साथीदारांसह मोहोळ परिसरात चारचाकीतून चोरी करण्यासाठी येत आहे.

त्यानुसार LCB टीमने मोहोळ–माळशिरस पालखी महामार्गावर सापळा लावला. काही वेळातच संशयित MH 11 AK 8674 हा कार क्रमांक दिसून आला. थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालकाने वेग वाढवत पळ काढला.



🔹 थरारक पाठलागात अमोल पवार काबूत:

LCB पथकाने कारचा पाठलाग करत तोंडले गावाजवळ वाहनाला गाठले. कार थांबताच आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पथकाने तत्परतेने पाठलाग करून अमोल उर्फ विशाल शंकर पवार (वय 21) याला ताब्यात घेतले.


🔹 १३ गुन्ह्यांची कबुली — ११ गुन्ह्यांमध्ये ‘पाहीजे’

अटक आरोपी अमोल पवार हा सराईत गुन्हेगार असून चौकशीत त्याने खालीलप्रमाणे १३ चोरी व जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली :


मोहोळ – GR 1075/2025

सांगोला

अकलुज

टेंभुर्णी (अनेक गुन्हे)

कुर्डुवाडी

पंढरपूर

वडगाव निंबाळकर (पुणे ग्रामीण)

वालचंदनगर (पुणे ग्रामीण)


आरोपी अमोल पवार एकूण ११ गुन्ह्यांमध्ये ‘पाहीजे’ असल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.


🔹 मोठा मुद्देमाल जप्त-

अटक आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त :

५५ किलो कॉपर वायर...

सोन्याचे दागिने...

चोरीसाठी वापरलेली चारचाकी कार...


🔹 फरार साथीदारांचा शोध सुरु-

आरोपी अमोल पवार याचे साथीदार —

कुणाल परशु काळे, सोमनाथ दत्तु पवार, रवी सतिश काळे, दत्तु सुरेश काळे, दादया येँगाप्पा काळे (रा. सवतगव्हाण, अकलुज) हे सध्या फरार असून पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू केली आहे.


🔹 कारवाईत सहभागी अधिकारी–कर्मचारी-

ही धडाकेबाज कामगिरी खालील पथकाने बजावली :

सहा. पोलीस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ सलीम बागवान, रवी माने, धनराज गायकवाड, पोलीस कर्मचारी विरेश कलशेट्टी, अश्विनी गोटे, बाळराजे घाडगे, अनवर अत्तार, हरीष थोरात, राहुल दोरकर, विनायक घोरपडे, मनोज राठोड, सूरज रामगुडे, चालक सतीश बुरकुल यांनी बजावली.

संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


🔹 पुढील तपास-

अटक आरोपीला मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1075/2025 अन्वये ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.


📌 हॅलो रिपोर्टर स्पेशल-

ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हेगारीविरोधातील सक्रिय भूमिकेचे उत्तम उदाहरण असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments