दक्षिण सोलापूर | प्रतिनिधी:
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी (विडी घरकुल विभाग) परिसरात पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई करत अवैधरित्या कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 17 जर्सी जातीच्या गाईंची सुटका केली. आयसर मालट्रक MH 23 / W 8090 मधून गाईंची क्रूरपणे दाटीवाटीने वाहतूक केली जात असल्याचे आढळले. ट्रकचालक व वाहनमालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
📌 कसे उघड झाले प्रकरण?
14 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पो.उपनिरीक्षकांनी विडी घरकुल चौकीला फोनवरून माहिती दिली की गोरक्षकांनी संशयित ट्रक ताब्यात घेतला आहे. त्यानंतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
📌 घटनास्थळी काय आढळले?
पोलिसांनी पंचासमक्ष ट्रकची पाहणी केली असता—
हौद ताडपत्रीने पूर्ण झाकलेला...
आत टॉर्चच्या उजेडात 17 जर्सी गाई (14 मादी, 3 नर)...
एकमेकींच्या अंगावर दाटीवाटीने, क्रूरपणे डांबलेल्या...
कोणताही वाहतूक परवाना नसल्याचे निष्पन्न...
💰 जप्तीचे तपशील
जप्त माल प्रमाण/वर्णन अंदाजे किंमत
जर्सी जातीच्या 17 गाई 3 नर, 14 मादी ₹2,55,000
आयसर मालट्रक MH 23/W 8090, तपकिरी रंग,
₹1,00,000, एकूण जप्ती — ₹3,55,000
📜 नोंदवलेले गुन्हे
ट्रक चालक व मालकाविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल —प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, कलम 11(1)(जे), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976, कलम 6, मोटार वाहन अधिनियम 1988, कलम 83, 177 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🔍 पुढील तपास
पुढील तपास पोलीस हवालदार कुवर हे करीत आहेत..

0 Comments