सोलापूर प्रतिनिधी : संविधान बचाव समिती, सोलापूर आयोजित 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चासाठी परवानगी मिळावी यासाठी समितीच्या प्रतिनिधीमंडळाने पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त मा. विजय कबाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या चर्चेदरम्यान ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे, कामगार नेते अशोक जानराव, जनार्दन शिंदे, वास्तुविशारद राजरत्न फडतरे, धर्मेंद्र चंदनशिवे, आप्पासाहेब लोकरे, सिद्धार्थ जाधव, राजाभाऊ सोनकांबळे, समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधींनी मोर्चासाठी आवश्यक परवानग्या, सुरक्षा आणि मार्गयोजनांवर सविस्तर चर्चा करत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.


0 Comments