सोलापूर प्रतिनिधी: माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कारला पुणे-मोहोळ महामार्गावर आज सकाळी अपघात झाला. मात्र सुदैवाने जगताप यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे उपसंचालक कार्यालयात सुनावणी असल्याने जगताप हे मंगळवारी सकाळी पुण्याकडे रवाना झाले होते. मोहोळजवळ त्यांच्या कारमध्ये अचानक बिघाड निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी दुसरी कार घेऊन प्रवास सुरू केला.
शेटफळजवळ उसाने भरलेल्या ट्रॉलीला ही कार मागून धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र जगताप आणि चालक यांनी सीट बेल्ट लावलेले असल्याने एअरबॅग उघडल्या व मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर डोके बोनेटवर आदळल्याने जगताप यांनी किरकोळ उपचार घेतले असून त्यांना तत्काळ रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
या अपघातामुळे त्यांची पुण्यातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत टळली.

.jpeg)
0 Comments