Advertisement

Breaking News
Loading...

'वॉन्टेड' आणि ‘काल्या’ला सोलापूर पोलिसांची तडीपारी; शहराबाहेर हाकलले...


सोलापूर शहर प्रतिनिधी: सोलापूर शहर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करत त्यांना सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे. सलमान उर्फ वॉन्टेड इरफान होटगीकर (वय ३२, सुजाता नगर) याच्यावर २०१३ ते २०२५ दरम्यान दंगा, मारामारी आणि शस्त्रासह खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने एमआयडीसी पोलिसांनी त्याचा तडीपारी प्रस्ताव सादर केला होता.


तसेच अनिल उर्फ काल्या राजू चौगुले (वय ३०, मड्डी वस्ती) याच्यावर 2018 व 2024 मधील चोरीचे गुन्हे असल्याने सदरबझार पोलिसांनी कार्यवाही केली.


या दोन्ही प्रस्तावांची तपासणी करून पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार दोन्ही आरोपींना दोन वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments