सोलापूर प्रतिनिधी: राज्य निवडणूक आयोगाने आज, 14 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई, उल्हासनगर, पनवेल, मालेगाव, जळगाव, सोलापूर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला या प्रवर्गांकरिता पुनश्च आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित प्रवर्गांसाठीची आरक्षण सोडत कार्यक्रम 17 नोव्हेंबर 2025 रोजी, स्थळ : हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर, वेळ : सकाळी 10:30 वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमास जनप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक नागरिक तसेच माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.


0 Comments