Advertisement

Breaking News
Loading...

निंबर्गीत अज्ञात कारणावरून तरुणीची गळफासाने आत्महत्या...

 


प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर

निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथे अज्ञात कारणावरून १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली.


मृत तरुणीचे नाव अक्षता बाळासाहेब काटकर (वय १८) असे आहे. या प्रकरणाची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अक्षता हिचे वडिलांचे मूळ गाव सलगर बुद्रुक (ता. मंगळवेढा) असून, ती गेल्या काही वर्षांपासून निंबर्गी येथे आजोबा तुकाराम डोंगरे, आजी सुशाबाई आणि मावशी मीनाक्षी इंगळे यांच्यासोबत राहत होती. तीन वर्षांपूर्वी आई वैशाली यांचे निधन झाल्याने ती आजोळीत स्थायिक झाली होती.


अक्षता हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निंबर्गी येथील शाळांमध्ये झाले. अलीकडेच ती बारावी उत्तीर्ण झाली होती व शिवणकला प्रशिक्षण घेत होती.


मंगळवारी दुपारी ती घरी एकटी असताना तिने आतून दरवाजा बंद करून गळफास घेतल्याचे समोर आले. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने नातेवाईकांनी घरात जाऊन पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर तातडीने मंद्रुप पोलिसांना कळविण्यात आले.


पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी घटनास्थळी तपास केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालय, मंद्रुप येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मंद्रुप पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments