अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन...
अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कै. सिद्रामप्पा मलकप्पा पाटील यांचे वृद्धापकाळाने आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते वयाच्या ८८व्या वर्षी निवर्तले. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिद्रामप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अक्कलकोट परिसरातील अनेक विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिले. साधी राहणी, प्रामाणिक कार्यशैली आणि जनतेशी असलेले घट्ट संबंध यामुळे ते सर्वांच्या मनात आपली वेगळी छाप सोडून गेले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अक्कलकोट परिसरातील राजकीय, सामाजिक व सर्वसामान्य नागरिकांत शोककळा पसरली आहे. यांच्या आत्म्यास हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेल कडून भावपूर्ण श्रद्धांजली. 🕊️

0 Comments