अक्कलकोट प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अक्कलकोट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मिलन दादा कल्याणशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, सोलापूर शहर मध्यचे आमदार माननीय देवेंद्र दादा कोठे, अक्कलकोटचे आमदार माननीय सचिन दादा कल्याणशेट्टी, तसेच माजी जिल्हाप्रमुख आणि भाजपा ज्येष्ठ नेते शहाजी भाऊ पवार उपस्थित होते.
या महत्त्वाच्या संधीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष माननीय रविंद्रजी चव्हाण, तसेच भारतीय जनता पक्षातील सर्व मान्यवर नेत्यांचे आभार व्यक्त करताना मिलन दादा म्हणाले की,
“आपल्या आशीर्वादाने आणि अक्कलकोटकरांच्या दृढ साथीनं ही निवडणूक भारतीय जनता पक्ष भरघोस मतांनी जिंकेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
अखेरीस त्यांनी आपल्या प्रति दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानले.



0 Comments