मुंबई हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:
आज मुंबईतील वरळी येथील NSCI डोममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान मा. अजितदादा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी सोलापूरसह विविध जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्षाची विद्यमान संघटनात्मक रचना, स्थानिक राजकीय परिस्थिती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यासंदर्भातील पक्षाची तयारी यावर सखोल चर्चा झाली.
अजितदादा पवार यांनी बैठकीदरम्यान स्थानिक विकासकामांचा आढावा घेत, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उत्साह, जबाबदारी आणि एकजुटीने काम करून पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या बैठकीत सोलापूर शहर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. सुधीर खरटमल यांनी अजितदादा पवार आणि सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला.
या बैठकीस राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार कल्याणराव काळे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष उमेश पाटील, शहर अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंदा चंदनशिवे, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, गटनेता तौफिक शेख, प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, प्रदेश सचिव इरफान शेख, नगरसेवक गणेश पुजारी, शहर उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे यांच्यासह पक्षाचे विविध विभागांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.





0 Comments