Advertisement

Breaking News
Loading...

🚨 ब्रेकिंग न्यूज: ३५ दुचाकी जप्त; जेलरोड पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी...

 

सोलापूर | प्रतिनिधी (हॅलो रिपोर्टर न्यूज): सोलापुर शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सांगली, मुंबई आणि ठाणे अशा विविध जिल्ह्यांमधील एकूण ३५ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश मिळाले आहे.


अलीकडील काही महिन्यांपासून शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना या गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले होते.



गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी हेवन टॉवर, शनिवार पेठ येथे सापळा रचण्यात आला. तेथे चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याची ओळख शंकर भरत देवकुळे (रा. वैराग रोड, धाराशिव) अशी झाली.



चौकशीत आरोपीकडून विविध पोलीस ठाण्यांतील एकूण ३५ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत ₹१०,९८,०००/- इतकी आहे.

१) जेलरोड पोलीस ठाणे गुरन ४७८/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ DL ५८५६ २) जेलरोड पोलीस ठाणे गुरनं ५५३/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे MH १३ DF १८४८ ३) सदर बझार पोलीस ठाणे गुरन ७९७/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे MH १३ CY०६५५ ४) सदर बझार पोलीस ठाणे गुरन ७३२/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH ११ CN २४७ ५) सदर बझार पोलीस ठाणे गुरनं ८६८/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) MH १२ MP ६८३९ ६) सदर बझार पोलीस ठाणे गुरनं ८६७/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) MH १४ KH ८४०४ ७) सदर बझार पोलीस ठाणे गुरन ७९७/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे TN ६१ R ०४५२ ८) सदर बझार पोलीस ठाणे गुरनं ८६६/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ CE २०६२ ९) सदर बझार पोलीस ठाणे गुरनं ८७९/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ CX ४६३७ १०) फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ७५१/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ DR ६१९४ ११) फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ७३२/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ CW ५७९० १२) फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ७०८/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ CN ७०२५ १३) दापोडी पोस्टे गुरनं ३८०/२०२५ प्रमाणे MH १२ MP ६८३९ १४) भोसरी पोस्टे पिंपरी चिचंवड गुरनं ३८०/२०२५ प्रमाणे MH१४ KH८४०४ १५) खडक पोस्टे गुरनं ४५ / २०२५ MH १२PS ८२३८ PU ४०५२ १६) हडपसर पोस्टे गुरनं ११८५/२०२४ MH १२ १७) सिहंगड पोस्टे गुरनं १२५/२०२५ MH १२ SR ०५७५ १८) पिपंरी पोस्टे गुरनं ६२१ / २०२४ MH १४ FF ११३५ १९) खडक पोस्टे गुरनं २६२ / २०२५ MH १४ FA ९८२५ २०) भोसरी पोस्टे गुरनं ११६/२०२५ MH १४GH १३८५ २१) खडक पोस्टे गुरनं ४०९/२०२४ २२) पिंपरी पोस्टे गुरनं ३५२/२०२४ MH १४ HY २६३४ २३) सिहंगड पोस्टे गुरनं ३१९/२०२५ MH १२ SC ७४३३ २४) दापोडी पोस्टे गुरनं १०८/२०२५ MH १४ HB ५४८४ २५) संत तुकाराम नगर पोस्टे गुरनं ७६/२०२५ २६) भिवंडी पोस्टे गुरनं ३१० / २०२२ MH ०४ KH १९०५ २७) सहकार नगर पोस्टे गुरनं ३१६ / २०२४ MI1 १२ PW २५४८ २८) MH १४ FK १२५३ २९) MH २५ AA ०१०७ ३०) MH १० CY ६४१९ ३१)MH १४ HF २०३७ ३२) MH १२ SR HF ५२६७ उर्वरित ०३ मोटारसायकलबाबत तपास अदयापपर्यत चालु आहे. 

या दुचाकी सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, मुंबई आणि ठाणे या शहरांमधील विविध गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आल्या आहेत. काही प्रकरणांतील तपास अद्याप सुरू आहे.


ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) श्री. विजय कबाडे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग १) श्री. प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तसेच सफौ एम.डी. नदाफ, शरीफ शेख, गजानन कणगिरी, पोहेकॉ धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, वसंत माने, पोना भारत गायकवाड, पोकॉ उमेश सावंत, युवराज गायकवाड, संतोष वायदंडे, इकरार जमादार, कल्लप्पा देकाणे, राजपाल फुटाणे, विठ्ठल जाधव, साईनाथ यसलवाड, आणि सायबर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड, तसेच परिमंडळ कार्यालयातील पोना अयाज बागलकोटे, पोकॉ अर्जुन गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments