दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेसला नवे नेतृत्व — अनंत जगन्नाथ म्हेत्रे यांची तालुकाध्यक्षपदी निवड...
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी मंद्रुपचे युवा, जाज्वल्य कार्यकर्ते श्री. अनंत जगन्नाथ म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या शिफारशीनंतर थेट राज्यस्तरावरून आलेल्या नियुक्तीपत्राद्वारे ही मानाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.
म्हेत्रे यांच्या निवडीबद्दल तालुक्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
२०१२–२०१३ पासून काँग्रेस पक्षाला पंचक्रोशी व सिना–भीमा खोऱ्यात जिवंत ठेवण्याची धडपड, पक्षकार्याबद्दलची निष्ठा व बहुजनांसाठी केलेले योगदान—या सर्व कामाची दखल घेऊन उच्च नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. या सोनेरी संधीबद्दल अनंत दादांनी वरिष्ठांचे विशेष आभार मानले.
म्हेत्रे यांनी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हाध्यक्ष सातालिंग शटगार, तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह संघटीतपणे पक्षाची ताकद वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला.
ते म्हणाले की, “दक्षिण सोलापूरची ऐतिहासिक परंपरा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला पुनश्च मजबूत करणार. प्रत्येक गावात प्रभावी युवक संघटना उभी करून तालुका काँग्रेसमय करणार. खासदार ताईंनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”
दक्षिण ग्रामीण भागातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत मोठे बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी, कष्टकरी, युवक आणि आरक्षणवादी जनतेच्या मुद्द्यांवर संघर्ष करण्यास ते कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये अधिकाधिक युवकांना नेतृत्वाची संधी मिळावी आणि पक्षाचे बहुतांश उमेदवार निवडून यावेत, यासाठी ते कटीबद्ध राहणार असल्याचे म्हेत्रे यांनी नमूद केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यात युवक काँग्रेसला नवे ऊर्जावान नेतृत्व मिळाल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे..!

0 Comments