Advertisement

Breaking News
Loading...

नांदणी येथे आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न...

 

दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी): दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे मा. आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या उपस्थितीत बुधवारी सायं 5 वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.



या कार्यक्रमात एकूण ३ कोटी ४ लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यात नागमादेवी नियोजीत सभागृह, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधकाम व गावातील पाईपलाईन, रेणुकेश्वर मंदिर परिसरातील सुशोभीकरण, वेस बांधकाम, ताईबाई मंदिर परिसर सुशोभीकरण आदी कामांचा समावेश आहे.



राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा विस्ताराच्या कामाचे उद्घाटन आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. संजय धनंजे (कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणीपुरवठा विभाग), श्री. मनोज राऊत (गटविकास अधिकारी), श्री. दत्तात्रय सोळवण (उपअभियंता), श्री. जिलानी मत्तासाहेब मेस्तखाने (कनिष्ठ अभियंता) आदी मान्यवर उपस्थित होते.



या प्रसंगी नांदणी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवानंद बंडे, उपसरपंच गंगाबाई डोमनाळे, ग्रामसेवक श्री. स. ह. पाटील, तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.



Post a Comment

0 Comments