Advertisement

Breaking News
Loading...

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात मोठी कारवाई; सातरस्त्याजवळ जुगार अड्ड्यावर छापा, २५ जण ताब्यात, २.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त...

 


सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस आयुक्त राज कुमार यांनी दिले असून, त्या अनुषंगाने सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.


दि. २३/१२/२०२५ रोजी सातरस्ता परिसरातील इंडीया टी हाऊसच्या बोळात रौफ भंडाले नामक इसम जुगाराचा अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास छापा टाकण्याचे आदेश दिले.


त्यानुसार सातरस्ता येथील इंडीया टी हाऊसच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पत्त्याच्या डावावर जुगार खेळत असलेले एकूण ३० इसम आढळून आले. यापैकी २५ इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित ५ इसम गर्दीचा फायदा घेत मागील दरवाजातून पळून गेले.


या कारवाईत जुगार खेळताना मिळून आलेली रोख रक्कम, पत्त्यांचा कॅट, डीव्हीआर, इन्व्हर्टर व लोखंडी कपाट असा एकूण रु. २,३१,४००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या प्रकरणी बझार पोलीस ठाण्यात गु. र. नं. १०४६/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान हा जुगार अड्डा रौफ भंडाले व रियाज हुंडेकरी हे चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


ही उल्लेखनीय कामगिरी मा. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह पोलीस हवालदार राहुल तोगे, विद्यासागर मोहिते, जावीद जमादार, विजयकुमार वाळके तसेच पोलीस शिपाई आबाजी सावळे, गणेश शिंदे, धिरज सातपुते व विठ्ठल यलमार यांनी यशस्वीपणे पार पाडली.


Post a Comment

0 Comments