मंद्रूप/ दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील असा ठरला.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शिवशरण आण्णा पाटील, संस्थेचे सचिव गुरुसिद्ध म्हेत्रे, सहसचिव तथा माजी सरपंच मा. पिरप्पा म्हेत्रे, सरपंच अनिता कोरे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्राचार्य बसवराज कुमठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविधरंगी व विविध ढंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
ऐतिहासिक व प्रबोधनपर नाटक, लेझीम, लावणी, बंजारा नृत्य, रिमिक्स गाण्यांवरील नृत्य तसेच विनोदी नकला व डान्स अशा एकापेक्षा एक बहारदार सादरीकरणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या यशस्वी कार्यक्रमासाठी सुभाष सुतार, विद्यानंद हिरेमठ, सतीश जकुणे, महासिद्ध देशमुख, सौ. वृषाली साबळे, सौ. राणी आडवीतोटे, प्रा. नरेश पवार, प्रा. मल्लिकार्जुन थोरात आदी शिक्षक-शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, दानशूर व्यक्ती, संचालक मंडळ, सर्व प्राध्यापक-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, गावकरी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल मठपती यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा स्नेहसंमेलन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.




0 Comments