Advertisement

Breaking News
Loading...

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई अधिक तीव्र… कंदलगावात शांताबाई दत्तात्रय व्हणमाने यांच्या प्रचाराचा शुभारंभ 31 जानेवारीला...

 


कंदलगाव | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वार्तांकन : डॉ. राजदत्त रासोलगीकर...

ग्रामीण भागातील एका सामान्य, गरिब कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आज प्रस्थापित सत्तेला ठाम आव्हान देताना दिसत असल्याचे मत कंदलगाव परिसरातील मतदारांमधून व्यक्त होत आहे. ही लढाई केवळ एका उमेदवारापुरती मर्यादित नसून, ती सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी उभी राहिलेली जनशक्तीची लढाई असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्य उमेदवार शांताबाई दत्तात्रय व्हनमाने या आज सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक बनल्या असल्याचे मत मतदार व्यक्त करीत आहेत.



लहानपणापासून संघर्ष, कष्ट आणि समाजातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभाग अशी त्यांची वाटचाल राहिली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील सामान्य कुटुंबांशी थेट नातं जोडणारे, एका हाकेला तत्काळ प्रतिसाद देणारे आणि अडचणीच्या काळात आधार देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असल्याची भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळेच ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी स्पष्ट भूमिका घेणारी ठरत असल्याचे मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे.



दरम्यान, स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक प्रचाराचा प्रारंभ पुढे ढकलण्यात आला होता. शासकीय दुखवठा पाळल्यानंतर आता शांताबाई दत्तात्रय व्हनमाने यांच्या निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ शुक्रवार, 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कंदलगावचे ग्रामदैवत श्री केदारेश्वर मंदिरात होणार आहे.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास


नागरिकांनी, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments