सोलापूर ग्रामीण | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी :
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधुत नारायण शेंडगे याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद (MPDA) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली असून त्यास पुणे येथील येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील शरिराविषक गुन्हे, वाळूतस्करी तसेच अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात प्रभावी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वेळापूर येथील अवधुत शेंडगे (रा. पिसेवाडी, ता. माळशिरस) याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
अवधुत शेंडगे याच्यावर वेळापूर व अकलुज पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणी, अवैध सावकारी, घातक हत्याराचा वापर करून दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी प्रतिबंधक कारवाई होऊनही त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्ये करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी वेळापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जिल्हादंडाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. श्री. कुमार आशीर्वाद यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यास येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीतील वाळुतस्करी, शरिराविषक, मालाविषयक गुन्हे व अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पुढेही MPDA अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
सदरची कारवाई पुढील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहभागातून पार पडली :
मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी (पोलीस अधीक्षक), मा. श्री. प्रितम यावलकर (अपर पोलीस अधीक्षक), मा. श्री. संतोष वाळके (उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज), मा. श्री. अभिजीत पाटील (अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर), मा. श्री. संजय जगताप (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), श्री. भाउसाहेब गोसावी (सहाय्यक पोलीस निरीक्षक), श्री. शेळके (पोलीस उपनिरीक्षक), श्री. अनिस शेख, श्री. मोहन मनसावाले, श्री. खंडगाळे, श्री. यश आनंदपुरे, श्री. पाटील, श्री. माळी, श्री. पांढरे, श्री. हिंगनगावकर, श्री. काटे तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयातील श्री. उत्कर्ष देवकुळे (नायब तहसीलदार) व श्री. विलास म्हेत्रे यांनी सहकार्य केले.

0 Comments