मंदूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मंदूप जिल्हा परिषद गट क्रमांक 61 व मंदूप पंचायत समिती गण क्रमांक 121 साठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता मंदूप येथील श्री मळसिद्धप्पा देवालय येथून सुरुवात करण्यात येणार आहे.
मंदूप जिल्हा परिषद गटातून सौ. सोनाली प्रशांत (अण्णा) कडते, तर मंदूप पंचायत समिती गणातून श्री. मळसिद्ध शिवानंद मुगळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, भाजपच्या वतीने त्यांना मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा नेता म्हणजेच खरा लोकप्रतिनिधी असल्याचे नमूद करत, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक व महिलांच्या हक्कासाठी सातत्याने काम करण्याची भूमिका उमेदवारांनी मांडली आहे. मंदूप गणाचा सर्वांगीण विकास हाच आपला एकमेव ध्यास असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
येत्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंदूप परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या उमेदवारांना ‘कमळ’ या निवडणूक चिन्हाच्या माध्यमातून पाठिंबा द्यावा, असेही भाजपच्या वतीने सांगण्यात आले.
लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


0 Comments