कंदलगाव | हॅलो रिपोर्टर न्यूज|निवडणूक विशेष वार्तांकन| प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव पंचायत समिती गणात येणारी निवडणूक ही केवळ पक्षीय स्पर्धा न राहता सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या प्रामाणिक उमेदवाराची आणि सत्ताबळाच्या राजकारणाची थेट लढत ठरत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
काँग्रेस पक्षाकडून उभ्या असलेल्या शांताबाई दत्तात्रय व्हनमाने आणि भाजपाच्या उमेदवार प्रियंका आसबे यांच्यात ही निवडणूक अत्यंत चुरशीची असली तरी, जनमानसाचा कल स्थानिक नेतृत्वाकडे झुकत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून, त्याचा लाभ शांताबाई व्हनमाने यांना मिळत असल्याने त्या आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कंदलगाव पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून या मतदारसंघात लिंगायत व धनगर समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे. यासोबतच इतर समाजांचेही मतदार मोठ्या प्रमाणात असून हा गण सामाजिक समतोल राखणारा आहे. विंचूर, शंकरनगर तांडा, अंत्रोळी, कंदलगाव, गुंजेगाव, अकोले, गावडेवाडी, मनगोळी व येळेगाव या गावांचा समावेश असलेल्या या गणात सुमारे १७ हजार मतदार आहेत.
शांताबाई व्हनमाने या कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या, स्वच्छ प्रतिमेच्या आणि सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. गावागावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात त्या आपुलकीने सहभागी होत असून गरजू लोकांना मदतीचा हात देणारी सामाजिक बांधिलकीच त्यांची खरी ओळख आहे. त्यामुळेच त्या केवळ पक्षाच्या नव्हे तर सामान्य जनतेच्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत.
विशेष म्हणजे, धनगर समाजातील मतदारांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून गुंजेगावातून मिळणारा स्पष्ट कौल त्यांच्या विजयाची दिशा ठरवणारा ठरत आहे. “राजकारण सेवा म्हणून” ही भूमिका मतदारांना भावत असून, शांताबाई व्हनमाने या प्रजा विरुद्ध राजा अशा या लढतीत जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनल्या आहेत.
२०१७ च्या निवडणुकीचा इतिहास पाहता गणात बदलाची चाहूल यावेळी स्पष्टपणे जाणवत आहे. प्रामाणिकपणा, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि तळागाळातील लोकांशी थेट नातं या बळावर शांताबाई दत्तात्रय व्हनमाने यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
एकूणच, कंदलगाव गणात ही निवडणूक सत्तेच्या जोरावर नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर जिंकली जाणार असल्याचे चित्र सध्या ठळकपणे समोर येत आहे.




0 Comments