सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज : सोलापूर शहरातील जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात आज शुक्रवारी सायंकाळी खळबळजनक घटना घडली असून बाळासाहेब सरवदे यांचा अज्ञात व्यक्तींनी निघृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक माहितीनुसार या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती व हल्ल्याचा नेमका प्रकार याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून वैयक्तिक वाद, जुन्या शत्रुत्वाचा किंवा अन्य कोणत्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. अधिकृत माहिती मिळताच सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.

0 Comments